भाग्य उजळले बहुजन समाजाचे,बाळासाहेबात पाहतो आम्ही प्रतिबिंब बाबासाहेबांचे… -नरेश वाघमारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- वंचित बहुजन समाजात आत्मसम्मान निर्माण करण्यासाठी 40 वर्षे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणारे, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारे, देशाच्या प्रत्येक प्रश्नांची उकल शोधणारे विद्वान व्यक्तिमत्त्व , फक्त बाबासाहेबांच्या रक्ताचेच नाही तर विचारांचे वारसदार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कामठी येथील बाल सदन अनाथलयात आयोजित फळ वितरण कार्यक्रमा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे यांनी ऍड बाळासाहेब आंबेडकर संदर्भात भाग्य उजळले बहुजन समाजाचे बाळासाहेबात (ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर)आम्ही प्रतिबिंब पाहतो बाबासाहेबांचे…असे मत व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रिय अध्यक्ष व बहुजन नायक श्रध्देय ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसा निमित्त काल 10 मे ला वंचित बहुजन आघाडी कामठी तर्फे बाल सेवासदन अनाथ आश्रम कामठी येथील बालकांच्या हस्ते केक कापून व बालकांना केक,तोस,बिस्किटे आणि चशमा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे सर्वश्री नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे,नागपूर जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर ,माजी नगरसेवक दादा कांबळे, सी सी वासे, कामठी शहर अध्यक्ष दिपक वासनिक, नितेश नागदेवे , अजय मेश्राम , डॉ संजय शेंदरे, शकीलभाई अन्सारी, तुषार खोब्रागडे, सुनील बहादूरे, भाऊराव शंभरकर, रवी वानखेडे, विदेश डोंगरे,माजी नगरसेविका मोहलता मेश्राम ,क्रुपाशंकर ढोके , सुनील पेंदाम, संजीवनी मेश्राम महिला कार्यकर्ते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Indian Council of Medical Research and AYUSH Ministry sign MOU for collaborative and cooperative momentum on health research in the field of Integrated Medicine

Thu May 11 , 2023
The MOU will combine traditional knowledge with modern research & boost Ayurveda to further build its identity on the basis of scientific evidence: Dr. Mandaviya  New Delhi :- In a significant achievement demonstrating strengthening of the country’s health infrastructure and strong momentum to integrate and mainstream AYUSH, a Memorandum of Agreement (MoA) was signed between Indian Council of Medical Research […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com