न्यायालयातुन आरोपीला कारावासाची शिक्षा

नागपूर :-दिनांक २०,०२,२०२४ रोजी अति, सत्र न्यायाधिश क. १, नागपूर, एम व्ही देशपांडे, यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. १२१/२०२१, मधील, पोलीस ठाणे लकडगंज येथील अप. क. १२/२०२१, कलम ३०७, २०१ भा.द.वि. या गुन्हयातील आरोपी संतोष उर्फ युगणी अजित राऊत, वय ३५ वर्षे, रा. छोटा गोंदीया, मंडई चौक समोर, अगरबत्तीवाला हाऊस जवळ, गोंदीया याचेविरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने, आरोपीस कलम ३२४ भा.दं.वि. मध्ये ०२ वर्ष ०४ महिने २१ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा व २,०००/- रू. दंड, आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरीक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम २०१ भा.दं.वि. मध्ये ०९ महिने सश्रम कारावासची शिक्षा व ५००/- रू. दंड, आणि दंड न भरल्यास ०५ दिवस अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

दिनांक ०७.०१.२०२१ चे १२.४५ वा. चे सुमारास, पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत, हिरांझा बार समोरील, सिमेंट रोडवर, गंगाजमुना वस्ती येथे फिर्यादी अनवर शाह वल्द अच्चास शाह वय २८ वर्ष रा. वनदेवी नगर झोपडपट्टी, नागपुर हे त्यांचा मित्र मनोज गुप्ता याचेसह नेहमी प्रमाणे पापड विक्री करण्यासाठी आले असता पापड विकीचे पैसे देण्याचे कारणावरून आरोपीने फिर्यादीस चाकुने चेहन्यावर, कमरेवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून आरोपीविरूध्द कलम ३०७, २०१ भा.द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीस दिनांक २९.०९.२०२१ रोजी अटक करण्यात आली होती.

सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन पोउपनि सुनिल राऊत यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. श्याम खुळे यांनी तर आरोपी तर्फे ॲड. त्रिवेदी यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा, रविद्र लांडे यांनी काम पाहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, एकूण किमती ६,७५,०००/- चा मुद्देमाल जप्त

Thu Feb 22 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सदर हद्दीत जुना स्मॉल फायनंन समोर, एस. के टावर, बैरामजी टाउन, सदर, नागपुर येथे फिर्यादी निरज माखनलाल यादव वय २४ वर्षे, रा. मानव नगर, टेकानाका, कपिलनगर यांनी त्यांची हिरो होन्डा पॅशन प्रो मोटरसायकल क. एम.एच ३१ सि.डी ६२९५ किमती १५,०००/- ची लॉक करून ठेवली असता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून गुन्हा दाखल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com