न्यायाधीश निवासस्थानात देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वसंत कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण

गडचिरोली :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली च्या प्रांगणात व प्रमुख न्यायाधीश निवास येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वसंत कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस सलामी पथक व बैंड च्या संयुक्त तुकडीने राष्ट्रीय सलामी दिली.कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे जिल्ह्यातील दिव्यांग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला होता. विजेते दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत कुलकर्णी तसेच सचिव तथा दिवाणी न्यायाधीश, गडचिरोली आर.आर. पाटील यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. त्यानंतर सचिव यांनी २६ जानेवारी १९५० रोजी पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले स्वतंत्र भारताचे स्वत:चे संविधान लागु झाले व खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता या दिवशी आपण स्थापन केली होती त्यामुळे हा दिन संविधानाचे महत्व अधोरेखित करतो असे गणतंत्र दिवसाचे महत्तव सांगितले तसेच दिव्यांग व दुर्बल व्यक्तींच्ना नेहमी मदत करा, त्रास देऊ नका असा महत्वपूर्ण संदेश दिला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलकर्णी यांचे संबोधन लाभले.

यावेळी बोलताना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रीय भाव मनात ठेवून कार्य करा. आपल्या मधील एकता भंग होऊ देऊ नका झाली होती व आपण जेही कार्य करतो ते देश प्रेम मनात ठेवून करावे , राष्ट्र भक्ती मनात ठेवून कोणतेही कार्य केल्यास देशाची प्रगती निश्चित होईल व सगळ्यांनी एकोप्याने राहुन आपल्या मनामध्ये राष्ट्रिय भाव ठेवणे गरजेचे आहे. दिव्यांगांची सेवा ही देखील राष्ट्रभक्ती आहे असा देशभक्ती चा संदेश यावेळी त्यांनी दिला.

कार्यक्रमात मुख्य न्यायदंडाधिकारी एस.पी सदारफळे ,दिवाणी न्यायाधीश क स्तर सी.पी. रघुवंशी, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर वी.आर मालोदे, सह न्यायदंडाधिकारी एस.ए भैसारे, अन्य न्यायिक अधिकारी व वकील बार संघाचे अध्यक्ष आखाडे, ज्येष्ठ विधीज्ञ, न्यायालय प्रबंधक चौहान, न्यायालयीन-प्रशासकीय कर्मचारी, अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळेचे मुख्याध्यापक तसेच दिव्यांग विद्यार्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते व २६ जानेवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपूर मनपाच्या सेवांचा दर्जा वाढविणार - आयुक्त विपीन पालीवाल

Tue Jan 28 , 2025
– प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपा मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम चंद्रपूर :- आपण हे वर्ष संविधानाचे अमृत वर्ष म्हणुन साजरे करत आहोत, या अमृतवर्षात चंद्रपूर मनपातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, सोयी- सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार असुन,सर्वांनी आपल्या राष्ट्राला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपूर मनपा मुख्यालयात आयोजीत ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!