नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई :- नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी- सेवा उपलब्ध करून देतात. परंतु राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आहेत.या बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठीत करावी, असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात नागरी सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत वळसे पाटील बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री वळसे- पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या जाचक अटी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यामुळे अनेक नागरी बँका अडचणीत येत आहेत. याबाबत सतत गाऱ्हाणी येत आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत गठीत समितीने अभ्यास करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. तो अहवाल केंद्र शासनाला पाठवून मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सहकार मंत्री वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुगंधीत तंबाखूची विक्री करणाऱ्या तरुणास रंगेहात अटक

Wed Oct 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन पाणी टाकी जवळ न्यू येरखेडा येथे बिना परवाना अवैधरीत्या सुगंधी तंबाखू व खर्याची विक्री करणाऱ्या तरुणास नवीन कामठी पोलिसांनी अटक करून 50 हजार 575 रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवार ला रात्री साडेबारा वाजता सुमारास केली नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com