– महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने च्यावतीने पत्रकारांना न्याय मागण्याकरिता परिषदेत विजय जगताप, शुभम तविडे, सचिन पडोळे आणि दिनेश जनबंधू या सर्वांनी धाव घेतली.
नागपूर :- राकी महाजन यांनी सर्व माहिती सांगितल्यानंतर राष्ट्रीय कामगार सेना नागपूर विभागातील मेलेल्या माणसांचे कमिटीने पैसे दिले नाही तर जिवंत माणसाचे काय ? हा प्रश्न त्यांच्यासमोर पडल्यामुळे त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
राष्ट्रीय कामगार नागपूर विभाग कमिटी यांनी मनीष पडोळे 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज वंजारी व संजय लोणारे यांनी राष्ट्रीय कामगार सेनाच्या व्हाट्सअपच्या ग्रुप मध्ये मेसेज टाकला की, मनोज पडोळे यांच्या फॅमिलीला एक हात मदतीचा म्हणून कामगारांचा अकाउंटमधून प्रत्येकी पाचशे रुपये १ / ११ / 2022 या तारखेला कापण्यात आले. परंतु आज एक वर्ष होऊन गेले पण त्यांना मदत मिळाली नाही. आम्ही सर्व त्यांच्या कमिटीशी बोलून ही ते आम्हाला दिशाभूल करत होते. आम्ही मनीष पडोळे यांच्या घरी जाऊन विचारपूस केली त्यांना माहित पडल्यानंतर त्यांच्या वडिलांना बँकेत बोलावून 31 हजार रुपयाचा चेक दिले. त्यांचे उर्वरित रक्कम व त्यांच्या एका वर्षाचे व्याजासहित त्यांच्या फॅमिलीला देण्यात यावे. अशी मागणी परिषदेमध्ये केली आहे.