कोदामेंढी :- येथील मुक्कामी न राहणारे एकही पथदीप खरेदी न करता तीन लक्ष 88 हजार 474 रुपयाचे बोगस बिल काढून घोटाळा करणारे घोटाळेबाज सरपंच आशिष बावनकुळे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पदमुक्त करावे व ग्रामपंचायत अधिनियम कलम 179 नुसार घोटाळ्याची रक्कम जमा करेपर्यंत त्यांना दिवाणी तुरुंगात बंदीवासात ठेवण्याची मागणी मौदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महामंत्री कैलास देवतारे यांच्यासह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.