नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाच्या माध्यमातून शुक्रवारी २५ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील दहन घाटांची स्वच्छता सकाळी ७ वाजता पासुन केली जाणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाच्या माध्यमातून २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शुक्रवारी (ता.२५) दहाही झोनमधील २० दहन घाटांची स्वच्छता केली जाणार आहे. लक्ष्मीनगर झोनमधील जयताळा आणि सहकार नगर दहन घाट, धरमपेठ झोनमधील अंबाझरी आणि फ्रेन्ड्स कॉलनी दहन घाट, हनुमान नगर झोनमधील मानेवाडा आणि नरसाळा दहन घाट, धंतोली झोनमधील मोक्षधाम आणि चिंचभवन दहन घाट, नेहरुनगर झोनमधील दिघोरी आणि वाठोडा दहन घाट, गांधीबाग झोनमधील गंगाबाई दहन घाट, सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर दहन घाट, लकडगंज झोनमधील पारडी, भरतवाडा, कळमना आणि पुनापूर दहन घाट, आशीनगर झोनमधील वैशाली नगर आणि नारी दहन घाट व मंगळवारी झोनमधील मानकापूर दहन घाट येथे सफाई अभियान राबविण्यात येणार आहे.