‘नारे तकबिर अल्ला हो अकबर’ च्या गजराने दुमदुमले कामठी शहर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– ईद ए मिलादुन्नबी निमित्त कामठीत भव्य ‘मिरवणूक’श्री गणेश विसर्जनामुळे उत्सव मर्यादित करण्यात मुस्लिम समाजबांधवांचे सामंजस्य

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज 29 सप्टेंबर ला कामठीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर ‘च्या गजराने संपूर्ण कामठी शहर दुमदुमले होते.आजच्याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत व पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन येथील मुस्लिम समाजबांधवांनी यंदा वेळेची मर्यादा बाळगून ईद ए मिलादुन्नबी साजरा केला .मात्र या समजूतदारीतुन येथील मुस्लिम समाजबांधवांनी शहरातील कौमी एकता कायम असल्याचे सामंजस्य दाखविले.

मोहम्मद अली मंच परिसरातून मरकजी सिरतूनब्बी सोसायटीचे अध्यक्ष हाजी मोहमद हनिफ असरबी पहेलवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ईद ए मिलादुनब्बीच्या मिरवणुकीला सकाळी 8 वाजता प्रारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त श्रवण दत्त,सहाय्यक पोलीस उपायुक्त संतोष खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,जिल्हा परिषद सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे, माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी ,माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत,मो आबीद ताजी,नियाज अहमद,युसूफ इकबाल कुरेशी, नूर मोहम्मद तारिक कुरेशी,मोहम्मद अक्रम याकूब शेख,अहफाज कुरेशी,हाजी नासिर भाटी,मोहम्मद जाफर लाला, मोहम्मद फारूक शब्बीर, भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,कृष्णा यादव,इर्शाद कुरेशी ,डॉ नौशाद सिद्दीकी,रमेश दुबे,उदयसिंग यादव, नरेश चौकसे, सुनील खांनवाणी यासह आदी गनमान्य नागरिक उपस्थित होते.

ही मिरवणूक मो अली गंज क्रीडांगणावरून निघत शुक्रवारी बाजार, गोयल टॉकीज चौक, गांधी चौक, पोरवाल चौक, फेरूमल चौक, आदी मार्गे शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत डिजेवरील धार्मिक गीते,ध्वज फिरवणारे युवक,पारंपरिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव असा मिरवणुकीचा थाट होता.मिरवणुकीत लहानापासून ते मोठ्या वयाच्या समाजबांधवाणी सहभाग दर्शवून नारे तकबिर अल्ला हो अकबरची गर्जना केली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले . व प्रसादाचे वितरण करण्यात आले.या जुलूसचे मोहम्मद अली बगंज क्रीडांगणावर समारोप करण्यात आले.मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Sep 28 , 2023
मुंबई :- ‘ भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com