– बसपा तर्फे संघटन बांधणीवर विस्तृत चर्चा
नागपूर :-बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा अंतर्गत पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यां सोबत भेट घेऊन संघटन बांधणीवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांनी ओपुल तामगाडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सर्वांनी जिल्ह्यामध्ये काम करण्याकरिता आपले समर्थन देवून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे अगोदर त्यांचें सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन विधानसभेत ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्यापद्धतीने पुढे चालून सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जिल्हाध्यक्ष नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून सर्व सेक्टरमध्ये वार्ड मध्ये मी त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व स्तरात बहुजन समाज पार्टीच्या मुव्हमेंटला गतीदेण्याकरिता सोबत फिरणार आहे. असा विश्वास त्यांना दिला आणि त्याच प्रमाणे येत्या 10 ऑक्टोबर ला कांशीरामजी यांच्या 17 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना मोठ्या प्रमाणात अभिवादन नाचा कार्यक्रम घेण्यासाठी नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात तयारी साठी व मोठ्या प्रमाणात जनसामान्य लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याकरिता विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. या कार्यक्रमात विधानसभेला जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून बहुजन जागृती कार्यक्रम अंतर्गत मान्यवर कांशीरामजी यांच्या अभिवादन कार्यक्रम करण्याकरिता विधानसभेला कार्यक्रम देण्यात आला.
या बैठकीमध्ये पूर्व नागपूर चे विधानसभा अध्यक्ष धर्मपाल घोगले, उपाध्यक्ष संजय इखार, महासचिव सचिन मानवटकर, सचिव सोमेश्वर खोब्रागडे कोषाध्यक्ष डॉ.प्रवीण खांडेकर राजकुमार शेंडे, सुरज झोडापे, रोशनी दास, छबिता पाटील महिला आघाडी संयोजक ॲड.दृकुमार मेश्राम प्रभारी, बाबु इंगळे, अजय गायकवाड, हेमंत बोरकर, पंकज टवरे, धनराज हाडके शहर सचिव सप्नील ढवडे इत्यादी कार्यकर्ता बैठकीमध्ये उपस्थित होते. या बैठकीमध्ये संचालन संजय इखार यांनी केले तर आभार पाटिल यांनी मानले.