संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मटण मार्केटच्या मागे असलेल्या एका चाळे समोर एका 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सायंकाळी सहा दरम्यान निदर्शनास आली असून मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नाही।
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हलविण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.