महादेवघाटच्या पायरीजवळ आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात पाण्यात वाहून येत महादेवघाटच्या पायरीजवळ एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी 8 वाजता निदर्शनास आले असून सदर मृतक तरुणाच्या अंगात काळ्या रंगाची बनियान व निळ्या रंगाचे अंडरवीयर आहे.मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही.यासंदर्भात महादेव घाट येथील सफाई कर्मचारी फिर्यादी शिवदयाल कपिल देशमुख वय 57 वर्षे रा तुंमडीपुरा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर घटनेची नोंद करीत घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा विकास आराखडा 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम करा - आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

Tue Jul 18 , 2023
Ø उद्योग, कृषी, रेशीम, मत्स्यव्यवसाय, खनीज व पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना नागपूर :- विभागातील सर्व जिल्ह्यांनी विकासाची बलस्थाने, उत्कर्षाच्या संधी तसेच विविध क्षेत्रातील समतोल विकास व त्यासंदर्भात येणाऱ्या संभाव्य अडचणींचा व उनिवांचा अभ्यास करून जिल्ह्याचा विकास आराखडा येत्या 15 ऑगस्ट पर्यंत तयार करावा व या आराखड्यास 2 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा नियोजन समितीची मान्यता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com