नागपूर : सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा नागपूर येथे कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली याप्रसंगी नागपूर महानगरपालिका नेहरूनगर झोनचे सॅनिटरी इन्स्पेक्टर सोनू बागडे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक खरे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले शाळेचा विद्यार्थी हिमांशू हांडे यांनी संत गाडगे महाराज यांची वेशभूषा करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी अध्यक्षांनी व उपस्थित शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले तसेच शाळेच्या परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शाळेच्या शिक्षिका विशाखा गणोरकर यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितला. वसतिगृहाच्या अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन चेतना मेश्राम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रीती पाटील यांनी केले.