संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25 :- देशाची एकता ,अखंडता धोक्यामध्ये टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे .संघ आणि भाजप देशद्रोही असल्याचा आरोप करीत .याविरोधात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात 25 जून रोजी ‘भारत बंद ‘ची हाक देण्यात आली होती . या भारत बंद आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी हेमलताताई पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत नागरीकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला..
या भारत बंद आंदोलनाची सुरुवात जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली.या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते गण प्रामुख्याने उपस्थितीत होते