गांजा बाळगणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, नविन काटोल नाका चौक येथे एक ईसम गांजा विकीकरीता घेवुन येणार आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन गांजा विकीकरीता आलेला आरोपी नामे १) अभिषेक देवशंकर वर्मा वय २५ वर्ष रा. येरला, कळमेश्वर, जि. नागपूर, तसेच खरेदी करीता आलेले आरोपी नामे २) विक्रांत चंद्रकांत टकले वय ३७ वर्ष रा. सादीकावाद कॉलोनी, अवस्थी नगर चौक, मानकापूर, नागपूर ३) अरविंद मधुकर कोडापे वय ३३ वर्ष रा. रामनगर, तेलंगखेडी, अंबाझरी, नागपूर यांना ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातून विक्री करीता आणलेला ओलसर गांजा वजनी ६ किलो ७८० ग्रॅम किंमती १,३५,६००/- रू. चा मिळुन आला. आरोपींचे ताब्यातुन गांजा, तिन अॅक्टीव्हा गाडी, एक मोवाईल असा एकुण ३,४०,६००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे साथिदार ४) पंकज उर्फ बाबू चिनी रा. मकरधोकडा, ५) दिनेश नावाचा ईसम रा. रामटेके नगर है दोघे घटनास्थळाहुन पळुन गेले, आरोपींचे हे कृत्य कलम ८ (क), २०(ब) २ (ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना व मुद्देमाल पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे गिट्टीखदान यांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांने मार्गदर्शनाखाली, पोनि. गजानन गुल्हाने, सफौ, सिध्दार्थ पाटील, विजय यादव, अनिल अंबाडे, मनोज नेवारे, विवेक अढाऊ, मपोहवा. अनुप यादव, नापोअं, पवन गजभिये, राशीद शेख, पोअं. सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर, सहदेव चिखले, रोहीत काळे, राहुल पाटील यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Sat Mar 30 , 2024
नागपूर :- दिनांक २९.०३.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ केसेस, तसेच एन.डी.पी.एस अन्वये ०१ केस असे एकुण ०६ केसेस मध्ये एकुण १० ईसमावर कारवाई करून रू. ३,०९,८४०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.३६६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ६,७०,१००/- तडजोड शुल्क वसूल केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com