संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सफाई कर्मचाऱ्यांच्या मुला मुलींची शासकीय निवासी शाळा गव्हर्मेंट पब्लिक स्कूल नागपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन आगाज 2023 उत्साहात संपन्न झाले यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी सुकेशनी तेलगोटे सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर होते प्रमुख पाहुणे विनोद मोहतुरे समाज कल्याण गोंदिया , मोरेश्वर पडोळे प्रोप्रायटर व्यंकटेश रिअल इस्टेट, धर्मपाल मेश्राम पूर्व नगरसेवक होते.
सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा कलाकृत्या सादर केल्या टायगर कॅपिटल नागपूर व कांतारा चा वेशभूषेत पर्यावरण संरक्षणाचा कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केला कोळी नृत्य छत्तीसगढी नृत्य व आदीवासी नृत्य सादर करण्यात आले.
प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड व सुकेशनी तेलगोटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना सादर करता यावे व त्याचा विकास व्हावा यासाठी वार्षिक उत्सव हे एक व्यासपीठासारखे असते असे प्रमुख पाहुणे म्हणाले.
शाळेचा अहवाल व प्रास्ताविक मुख्याध्यापक स्नेहल शंभरकर यांनी सादर केले कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका विशाखा गानोरकर व स्वप्ना भागवत यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षक विजय आडे यांनी केले.