गांजा बाळगणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- कळमणा पोलीसांचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, पाळत ठेवुन पोलीस ठाणे हद्दीत चिखली चौक ते कळमणा स्टेशन कडे जाणारा मालधक्का कच्चा रोड येथून अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ ए. वाय ५२४६ ने काळया रंगाचे बॅगसह जाणारे आरोपी १) मोहम्मद सरफराज वल्द मोहम्मद अब्दुल सत्तार, वय ३८ वर्षे, टिपू सुलतान चौक,यशोधरानगर, नागपूर २) डोलामणी बुडू मेहर वय २४ वर्ष रा. श्रीराम नगर, जि. बालांगीर, ओरीसा है संशयीतरित्या दिसुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळील बँगची झडती घेतली असता त्यामध्ये ४ किलो ३०० ग्रॅम गांजा हिरव्या व पिवसळ रंगाचा किंमती अंदाजे ८६,०००/- रु. चा दिसुन आला. आरोपींचे ताब्यातुन गांजा, दोन मोबाईल फोन व अॅक्टीव्हा गाडी असा एकुण किंमती अंदाजे १,५६,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे हे कृत्य कलम ८ (क), २०(ब), २९ एन.डी.पी.एस. कायद्यानुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे कळमणा येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वरील निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि क. ५),  विशाल क्षिरसागर, सहा. पोलीस आयुक्त (कामठी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. प्रशांत पांडे, सपोनि, शशीकांत मुसळे, सफी. वाळा साकोरे, पोहवा. विशाल अंकलवार, विशाल भैसारे, चंद्रशेखर यादव, नापोअं. संदेश शुक्ला, पोअं. ललीत शेंडे, वसीम देसाई व युवराज कावडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस ठाणे सदर अंतर्गत महिलांसंबंधी होणाऱ्या गुन्हयाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सदर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी त्यांने पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचेसह सेंट उर्सुला शाळा व ज्युनीअर कॉलेज येथे भेट देवुन तेथील विद्यार्थीनींना व शिक्षक, स्टाफ यांना एकत्रीत जमा करून, त्यांना महिला संबंधी होणारे गुन्हे, गुडटच व बँडटच संबंधी मार्गदर्शन करून, अल्पवयीन मुला-मुलींचे घरातुन पळुन जाणे, मित्र-मैत्रीणी सोबत निर्जन स्थळी फिरायला जाणे व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com