#accused
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान, गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन दिनांक १३,०६,२०२३ मे १६.४० वा. ते १८.५० वा. दरम्यान पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत, उमरेड रोड, मोठा ताजबाग, एस.वो आयचे बाजुला रोडवर तिन संशयीत इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी १) अकबर सादीक अली वय २४ वर्ष २) शाहबाज खान हनिफ खान वय ३० वर्ष दोन्ही रा. खरबी रोड, हसनबाग ३) शेख तौसीफ शेख नासीर वय २६ वर्ष रा कब्रस्तान जवळ, हसनबाग यांचे साच्यातून १ किलो ९९० ग्रॅम मादक पदार्थ गांजा, तिन मोबाईल, रोख १,७३०/- रू तसेच दोन अॅक्टीव्हा मोपेड दुचाकी वाहने असा एकुण २,२२,५८०/- चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपींनी ज्याचे कडुन गांजा घेतला होता तो साथिदार शेख आसीफ रा. ताजबाग, बाराखोली याचा शोध सुरू आहे. मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द पोलीस ठाणे सक्करदरा येथे कलम ८(क), २०(ब), २(ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपींना मुद्देमालासह सक्करदरा पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे संजय पाटील, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी, सपोनि अरविंद शिटि सफा रविन्द्र भोसकर, पोहवा नाजिर शेख, नापो, निलेश ढोणे, पुरूषोत्तम जगनाडे, बजरंग जुनघरे, महेश काटवले, सतिश ठाकरे पोअ सतेंद्र यादव यांनी केली.