जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- फिर्यादी नामे साहील धिरज शेन्द्रे वय १९ वर्ष रा. प्लॉट नं. ११२, जुगलकिशोर ले-आउट, गोपाल नगर, नागपूर हा त्याचे घराशेजारी राहणारे मित्र नामे आशिष महादेव लोखंडे व त्याचा चुलत भाऊ विशाल मिलींद लोखंडे यांचेसह पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत श्याम नगर झोपडपट्टी, पाण्याचे टाकी जवळुन जात असता तेथे राहणारे आरोपी क. १) कुलदिप उर्फ कुन्नू शंकरलाल भारद्वाज वय २० वर्ष २) सतीश शंकरलाल भारद्वाज वय २३ वर्ष यांनी संगणमत करून आशिष लोखंडे सोबत असलेल्या जुन्या भांडणाचे कारणावरून लाकडी बल्लीने फिर्यादी व दोन्ही लोखंडे बंधु यांना मारहाण केली. तसेच आरोपी सतीश याने त्याचे जवळील चाकुने फिर्यादीचे पोटावर वार करून तसेच फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उ‌द्देशाने पुन्हा पोटावर वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी तेथे गाडी सोडुन पळुन गेले, तसेच दोन्ही लोखंडे बंधु हे सुध्दा पळुन गेले. जखमी फिर्यादी यास उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे सपोनि, कदम यांनी आरोपीविरूध्द कलम ३०७, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेवुन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या अनोळखी आरोपीचा शोध घेवुन १२ तासाचे आत अटक

Wed May 22 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलगी तिचे ट्युशन क्लासवरून सायकलने घरी जात असता, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत आरोपी एक अनोळखी ईसम याने फिर्यादी मुलीस थांबवुन तिचे सोबत अश्लिल वर्तन केले. फिर्यादी मुलीने आरडा-ओरडा केल्याने नमुद आरोपी तेथुन पळुन गेला. फिर्यादीने पोलीस ठाणे सिताबर्डी येथे तकार दिल्याने सिताबर्डी पोलीसांनी तात्काळ दखल घेवून तांत्रीक तपास केला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com