बुट्टीबोरी :- मौजा शनीमंदीर चौक बुट्टीबोरी येथे यातील फिर्यादी जखमी नामे अजय सवर्णानंद रामटेके, वय २४ वर्ष, रा. अॅडविल कॉलनी बुट्टीबोरी हा त्याचा मित्र रौनक चौधरी याचा पानठेला असल्याने पानठेला बंद केल्याने थोडा वेळ थांबले असता, दोन्ही आरोपी नामे- १) मंथन महादेव मोहुर्ले, रा. वार्ड क. ४ नवीन वस्ती बोरी २) गौरव नंदलाल श्रीवास्तव रा. बिरसा मुंडा चौक बोरी यांनी रौनक चौधरी याला सिगरेट मागितले परंतु रौनक चौधरी याने पानठेला बंद केल्याने त्यांना सिगरेट देण्यास नकार दिला असता दोन्ही आरोपीने रौनक चौधरी यास शिवीगाळ करून वाद करीत असतांना यातील फिर्यादी याने मधात जावुन त्याचे भांडण सोडवित असताना तु हमारे विच बोलणे वाला कोण असे म्हणुन फिर्यादी सोबत वाद घातला व हातबुक्याने मारहाण केली त्याच दरम्यान दोन्ही आरोपी पैकी एकाचे हातात धारदार शस्त्र होते ते फिर्यादीचे छातीवर व पोटावर मारून जखमी व रक्त निघत असल्याने प्रथम उपचाराकरीता चौधरी हॉस्पीटल तसेच नंतर माया हॉस्पीटल येथे भर्ती करून उपचार केला,
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे बोरी येथे आरोपीतांविरूद्ध कलम १०९, ३(५) विएनएस अन्वये गुन्हा नोंद केला असुन यातील आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिश्वक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे बोरी येथील ठाणेदार पोनि प्रताप भोसले व त्यांबा स्टाफ यांनी पार पाडली.