रामटेक :- पोस्टे रामटेक येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, वार्ड नं. ०५ मनसर येथे दोन इसम हातामध्ये काहीतरी शस्त्र घेवुन गोंधळ करत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने स्टाफसह वार्ड नं. ०५ मनसर येथे गेले असता आरोपी नामे- १) पुंडलिक बाबाराव अडकने, वय ५८ वर्ष, २) अमन पुंडलिक अडकने, वय २२ वर्ष, रा. दोन्ही रा. वार्ड क्र. ०५ मनसर ता. रामटेक दोन्ही आरोपी हे दोघेही फोल्ड होणारे जुनि पूराणी गंजलेली चाकू (गुप्ती) आरी वारीने एकमेकाच्या हाता मध्ये घेवुन लोकांच्या मनात भिती निर्माण होईल अशा स्तीथीत दिसुन आल्याने आरोपीचे ताब्यातून ६९ सेमी लांबीची, ३७ सेमी पाता ३२ सेमी मुठ, १० सेमी मध्य भागातील गोलाई असे फोल्ड चाकु (गुप्ती) जप्त करण्यात आला आहे. त्याला वाकु बाबत विचारणा केली असता उडवाउडविचे उत्तरे देत होता. आरोपीतांविरूद्ध कलम ४/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपीतांना सुचनापत्रावर रिहा करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोहार,अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे रामटेक येथील ठाणेदार पोनि प्रशांत काळे, नापोशि गोपाल डोकरमारे, पोअं. चेतन ठाकरे यांनी पार पाडली..