सावनेर :- अंतर्गत 04 कि.मी अंतरावरील आय टी आय सावनेरचे गेट समोर सावनेर येथे दिनांक २९/०७/२०२३ ला यातील फिर्यादी नामे– अंकित अरुन कडू, वय २६ वर्ष, रा. आदासा ता. कळमेश्वर ह. मु बसवार ले आउट सावनेर हे आरोपी नामे- १) १) महादेव पुरे २) सुरेश मोतीराम बिलवार ३) विनोद बंबुरे सर्व रा. पहिलेपार सावनेर यांना चांगल्या प्रकारे ओळखत असून आरोपी क्र. १) यांचेसोबत एक महिन्या पूर्वी आरोपी क्र. १ याने केलेल्या अपघाताचे कारणावरून आरोपी सोबत फिर्यादीचा वादविवाद झाला होता. फिर्यादी हा झोपण्याकरिता हार्डवेअरच्या दुकानात आय. टी. आयच्या रस्त्याने मोटरसायकलने दुकानाकडे जात असता तेथे आरोपी क्र. १) २), ३) हे उभे दिसले व त्यांनी फिर्यादीचे गाडीसमोर येवून फिर्यादीस थांबविले व आरोपी क्र. १ याने फिर्यादीचे उजव्या गालावर भुक्की मारून खाली पाडले केस धरून उभे केले व आरोपी क्र. २ व ३ यांनी फिर्यादीस पकडुन ठेवले त्याच वेळी आरोपी क्र. १ याने खिशातील चाकु काढून फिर्यादीचे गळ्यावर फिरविला डाव्या कुशीवर, हनवटीला, छातीवर चाकूने वार केले त्यामुळे फिर्यादी जागेवर रक्तबंबाळ झाला व फिर्यादी स्वतःच धावपळ करुन गाडीला किक मारुन सरकारी दवाखान्यात सावेनर येथे गेला व नंतर त्याला नागपुर येथे रेफर केले. यातील आरोपी क्र. १, २, ३ यांनी संगणमत करून फिर्यादीचे मोटरसायकल अडवुन चाकुने मारहाण करून जखमी करून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो स्टे सावनेर येथे आरोपीताविरुद्ध कलम ३०७, ३४९ ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपी क्र. २) याला अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे हे करीत आहे..