चाकूचा धाक दाखवुन युवकास लुटणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई 

नागपूर :- फिर्यादी सागर चंद्रभान बाजनघाटे, वय २५ वर्षे, रा. सिरोंजी ता. सावनेर हा मोटारसायकल क्रमांक एम. एच.-४०/वि. झेड-९२३२ नी सावनेर वरुन खापा मार्गे बडेगांव रोडनी घरी जात असतांना दुपारी ०३/३० वा. सुमारास उमरी फाटयाचे समोर १०० मिटर अंतरावर दोन इसमांनी फिर्यादीस हात दाखवुन थांबवुन नमुद अज्ञात इसमांनी चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा वन प्लस नॉर्ड सीई-२ कंपनीचा मोबाईल फोन आणि विएसएनएल कंपनीचा मोबाईल फोन व पॅकेट मधील १८७०/- रोख आणी आधार कार्ड असा मुद्देमाल जबरीने हिसकावून पळुन गेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे खापा येथे अप. क्र. ५०७/२३ कलम ३९२, ३४ भादवि, अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता, सदर घटने पासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. तेव्हापासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत होते.

दि. ०९/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे सावनेर हद्‌दीत पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली की, सावनेर बस स्थानक जवळ दोन इसम चोरीचे साहित्य विकण्याकरीता आलेले असुन त्यांचे वर्तणुक संशयास्पद आहे, अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचुन दोन्ही इसमांना ताब्यात घेतले, त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने १) प्रवीण प्रकाश गजभिये, वय २७ वर्ष, रा.चिचघाट, ता. जि. पांडुरणा मध्यप्रदेश २) मच्छिंद्र व्यंकँटी कदम, वय ३९ वर्ष, रा. वार्ड न. २८ इंदिरा कॉलनी शास्वी वाढ पांढुर्णा जिल्हा पांडुणा मध्यप्रदेश असे सांगितले. वरील नमुद दोन आरोपीतांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचे साहित्य मिळून आले, त्याचे गुन्हे अभिलेखाशी पडताळणी केली असता ते पोलीस स्टेशन खापा अप. क्र. ५०७/२३ कलम ३९२, ३४ भादवि. या गुन्हयातील असल्याचे दिसुन आले. सदर गुन्हयाबाबत त्यांना विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे सांगितले, करीता नमुद दोन्ही आरोपीतांकडुन गुन्हयातील १) एक वन एलस कंपनीचा मोबाईल किंमत २५,०००/- रुपये २) गुन्हयात वापरलेली एक होंडा शाईन कंपणीची दुचाकी वाहन विना क्रमांकाची किंमत ७५,०००/- रुपये ३) नगदी ५८०/- रुपये असा एकूण १,००,५८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला व गुन्ह्यातील मुद्देमाल, कागदपत्रे, २ आरोपी पुढील तपास प्रक्रियेकरिता पोलीस स्टेशन खापा यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर, रोशन काळे, संजय बांते, आशिष मुंगळे, प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, किशोर वानखेडे, वीरेंद्र नरड, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, पोलीस नायक सतीश राठोड सायबर सेल ना. ग्रा. यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सदोष मनुष्यवध घडवून आणणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

Thu Jan 11 , 2024
पारशिवनी :- दिनांक ०९/११/२०२० ते २२/२४ वा. दरम्यान फिर्यादी नामे सरकारतर्फे पोना/५७९ मनीराम नेवारे पो.स्टे. पारशिवनी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. पारशिवनी येथे अप, क्र. २८५/२० कलम ३०४,२०१ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दिनांक १२/१०/२०२० चे ०९/०० वा. दरम्यान यातील आरोपी नामे बापुराव गणपत मिसार वय ६९ वर्ष रा. कोंढासावळी याने आपले शेतात कोंबडयाचा कुटाराचे संरक्षणाकरीता जाळीचे कंपाउंड लावुन त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com