पत्नीची हत्या करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

अरोली :- अंतर्गत मौजा कोदामेंढी येथे दि. ०८/०२/२०२४ चे ०८.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- उमेश जगन शेंडे याला फोनव्दारे माहिती मिळाली की, तुझी बहिण मृतक नामे हिरा विजय गुरनुले, रा. कोदामेंढी हिचा मृत्यु झाला आहे. असे कळल्यावर फिर्यादी घरी गेला असता त्या ठिकाणी फिर्यादीची बहिण हिरा हि मृत अवस्थेत पडलेली होती, याबाबत मृतक बहिणीची मुलगी कल्याणी विजय गुरनुले हिला विचारले असता तिने सांगीतले कि, वडीलांनी तिला रविवारी तसेच काल दुपारी काठीने खुप जास्त प्रमाणात मारहाण केली होती. यामुळे हिरा हिचा मृत्यु झाला आहे, अशी पोस्टे अरोली येथे माहिती मिळताच पोस्टे अरोलीचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. आरोपी नामे- विजय सुरेश गुरनुले, रा. कोदामेंढी याचा तात्काळ शोध घेवुन सदर आरोपीस अरोली पोलीसांनी ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भादंवि, कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि किशोरकुमार वैरागडे हे करीत आहे.

सदरची कार्यवाही हर्ष पोहार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण,रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात्त पास्टे अरोली येथील तात्कालीन ठाणेदार सपोनि किशोरकुमार वैरागडे, पोउपनि सुशिल सोनवने व त्यांच्या टिमने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिन सोमवारी 

Fri Feb 9 , 2024
नागपूर :- विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात दिलेले निवेदन, टोकन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त उत्तराची प्रतीसह उपस्थित राहावे, असे तहसिलदार महेश सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com