नागपूर :- दिनांक १०.०८.२०२३ चे ०४.३० वा चे सुमारास फिर्यादी पंकज रामजनम यादव वय ३० वर्ष रा. चौबे ट्रान्सपोर्ट टोल नाक्या जवळ दाभा, नागपूर यांनी त्यांचे कंटेनर गाडी चौबे ट्रान्सपोर्ट समोर उभी केली असता आरोपी क. १) मोहम्मद सलमान वल्द रईस अहमद वय २८ व रा. गिल्लोरी लालगंज यांनी फिर्यादीस कंटेनर हटविण्यास सांगीतले असता या कारणावरून दोघान मध्ये वाद होवून आरोपी क. १ व त्याचे साथिदार आरोपी क. २) शहनान ३) महफुज यांनी संगणमत करून तिघांनी फिर्यादीस शिवीगाळ करून हातबुक्कीने व लोखंडी रॉडने फिर्यादीचे हाता पायावर मारून गंभीर जखमी केले. जखमी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल केले असून उपचार सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे पोउपनि फड यांनी आरोपीविरुद्ध कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ भा.दं. वी. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी क. १ यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.