नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत कामठी रोड, उपलवाडी, जम-जम आईस फॅक्ट्री मागे, कश्यपचे घरा समोर, कपिलनगर, नागपूर येथे राहणारा शुभम उर्फ विक्की रूपचंद शाहु वय २८ वर्ष त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यातुन १४ किलो १२० ग्रॅम हिरव्या रंगाचा ओलसर गांजा किंमती २,८२,४००/- रू. चा मिळुन आला. आरोपीचे ताब्यातुन गांजा, एक मोबाईल फोन असा एकुण २,९७,४००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे हे कृत्य कलम ८ (क), २०(ब) (२) (ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरूध्द पोलीस ठाणे कपिलनगर येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाई कामी कपिलनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा, पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि, राहुल शिरे, सपोनि, मनोज घुरडे, पोहवा, विजय यादव, नितीन सांळुखे, नापोअं. पवन गजभिये, पोअं. शेषराव रेवतकर, सहदेव चिखले, मपोहवा, अनुप यादव यांनी केली.