स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई
उमरेड :-पो.स्टे. कुही येथे अप. क्र. ३३ / २०२३ कलम ४५७, ३८० भा.द.वि. पोस्टे उमरेड येथे अप. के. ३०६/२०२३४५७, ३८० भा.द.वी. गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपासात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने दिनांक १५/०६/२०२३ रोजी उमरेड उपविभागातील पोस्टे उमरेड अप क्र. ३०६ / २०२३४५७ ३८० भा.द.वी. व पोलीस स्टेशन कुही येथील अप क्र. ३३/२०२३ कलम ४५७, ३८० भा.द.वी. बारमधील दुकानफोडी च्या गुन्ह्यात समांतर तपास करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे हिंगणा नागपूर शहर हद्दीत संशयीतरीत्या फिरत आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने हिंगणा नागपूर शहर परीसरात सापळा रचुन रेड केली असता आरोपी नामे १) अभिषेक अनिल नगराळे, वय २८ वर्ष रा. वार्ड क्र. २ वानाडोंगरी विजय नगर ता हिंगणा, जि. नागपूर २) राकेश दिलीप दास, वय ३१ वर्ष, रा. शिवाजी पार्क जवळ वार्ड क्र. १० फ्लॅट क्र. २९१ हिंगणा रोड नागपूर ३) अनुप सुधीर पाटील, वय ३० वर्ष, रा. शुभम नगर प्लॉट क्र. ४३ हिंगणा रोड नागपूर ४) संदीप विठ्ठलराव इंगळे वय ४२ वर्ष रा. हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या मागे प्लॉट १४७ नागपूर यांना ताब्यात घेऊन बारचे झालेल्या दुकानफोडी बाबत सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, बारचे दुकानफोडी करून चोरी केल्याचे सांगितले. सदर आरोपीतांना ताब्यात घेवुन आरोपीतांकडुन १ ) LG कंपनी चा टीव्ही ३००००/- २) मोबाईल किंमती ३००० /- रू. ३) विदेशी दारू वेगवेगळ्या कंपनीची किंमती अंदाजे ४१९३० /- रू असा एकूण ७४९३० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांना पुढील योग्य कायदेशीर कारवाईस्तव पोलीस स्टेशन उमरेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर प्रमीण याचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अशिपसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस हवालदार मिलिंद नांदुरकर, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, रोशन काळे, पोलीस नायक बालाजी साखरे, अमृत किये, रोहन डाखोरे, विपीन गायधने, सतिश राठोड (सायबर सेल) तसेच चालक पोलीस शिपाई आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.