एमपीडीए चा फरार आरोपी कारागृहात रवाना

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत एमपीडीए ची कारवाई करून मा जिल्हाधिकारी हयानी एक वर्षा करिता आदेश पारित केलेला आरोपी निखिल सलामे हा फरार झाला होता. कन्हान पोलीसानी पकडुन त्यास एक वर्षा करिता मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबद्ध करण्यात आले.

पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत इसम निखिल पंचम सलामे वय ३० वर्ष राह. शिवाजी नगर कन्हान याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत एमपीडी ए ची कारवाई करण्यात आली होती. मा. जिल्हाधिकारी नागपुर यांनी (दि.२९) जुलै २०२३ ला एक वर्ष करिता आदेश पारित केला होता. आदेश पारित दिनांक पासुन सदर इसम हा फरार होता. गुरूवार (दि . १४) मार्च ला इसम हा मौजा गोंडेगाव रोड येथे असल्याची गोपनीय माहितीवरून स्टाफ सोबत जाऊन सदर स्थानबद्ध आरोपी यास ताब्यात घेऊन सदर आदेश तामिल करण्यात आला व त्यास एक वर्षा करिता मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबद्ध करण्यात आले.

सदरची कारवाई हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण तसेच संतोष गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी कामठी विभाग कन्हान, यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कन्हान चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोना अमोल नागरे, पो. अ आकाश सिरसाट, अश्विन गजभिये आदीनी यशस्विरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले

Sat Mar 16 , 2024
– सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला, निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला – जवळपास 40 वेळा सर्वोच्च न्यायालयांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विश्वास व्यक्त केला आहेhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4  नवी दिल्ली :-भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत अशा दोन रिट याचिका फेटाळून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com