“प्रतिकुल परिस्थीतीवर मात करून सर्वोच्च पदावर पोहचणे वाचनामुळे शक्य आहे ” – आमदार अँड.अभिजीत वंजारी       

सात शासनमान्य ग्रंथालयाना आठ लाख रूपयांचे ग्रंथ वितरण

भंडारा :- वाचनाने माणसाचे मन ,मनगट,मस्तक हे प्रगल्भ होते. वाचनाला चिंतनाची जोड असेल तर सर्वागिण व्यक्तीमत्व विकास होतो तसेच प्रतिकुल परिस्थितिवर मात करून सर्वोच्च पदावर पोहचणे फक्त वाचनामुळेच शक्य असल्याचे मत आमदार अभिजीत वंजारी यांनी वाचन प्रेरणा दिनानितित्त आयोजित कार्यक्रमात केले. मराठी भाषा विभाग मुंबई, जिलाधिकारी कार्यालय भंडारा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित “वाचन प्रेरणा दिन” निमित्त सार्वजनिक वाचनालय, भंडारा येथे करण्यात आले होते .

भारताचे माजी राष्ट्रपति डॉ. ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन वाचन प्रेरणा दिन सार्वजनिक वाचनालय, भंडारा येथे  जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. माधव पत्रिकर, माजी ग्रंथपाल आर.एस. मुंडले आर्ट्स कॉमर्स कॉलेज, नागपूर हे तर उदघाटनक म्हणून विभागीय उपअधिकारी भंडारा हे होते, विशेष अतिथि म्हणून आमदार अभिजीत वंजारी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रकांत वडसकर, विभागीय वाहतूक अधिकारी भंडारा, अरविंद हिंगे तहशीलदार भंडारा, सुनील पाटिल, सचिव, गांधी निधि स्मारक नागपूर, प्रमोद अणेराव साहित्यिक भंडारा हे होते, सुरुवातीला दिप प्रज्वलन करून ऐ. पी. जे. अब्दुल कलाम व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात तसेच ग्रंथ प्रदर्शिनीचे उदघाटन पाहूण्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील जेष्ठ लेखक नीलकंठ रणदिवे, हर्षल मेश्राम व अमृत बनसोड यांचे शाल श्रीफल व मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच आमदार वंजारी यांच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षातील स्थानिक निधीतुन जिल्ह्यातील सात शासन मान्य ग्रंथालयाना रक्कम रू 834000/-चे ग्रंथ वितरित करण्यात आले. तसेच हिमालय प्रकाशन नागपूर तर्फे प्रकाशित स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.

सध्या मोबाईलच्या वापरामुळे तरूणांमध्ये वाचनाचा कल कमी दिसून येत आहे. मात्र संयमित व अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व घडविण्यासाठी सर्वागिण व चौफेर वाचन आवश्यक आहे. सार्वजनिक वाचनालय ही ज्ञानाची पाणपोई आहे. ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांचे जिवन आपल्याला स्फूर्ति देणारे असून ग्रंथाच्या सहवासाने ते इथ पोहचले म्हणून ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ही ज्ञानमंदीरे सशक्त व्हावीत ग्रंथालयांच्या राज्यातील सार्वजनिक ग्रंथालायचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू,असे आश्वासक विधान आमदार वंजारी यांनी यावेळी केले . तर, डॉ. कलाम यांचे संपूर्ण जिवनच प्रेरणा देणारी गाथा असल्याचे प्रतिपादन ग्रंथपाल संजय राठोड यांनी केले. तर ग्रंथ वाचनमुळे माणूस क्रियाशील होतो व सकारात्मक विचार तयार म्हणून वाचन नेहमीच करावे हीच खरी प्रेरणा आजच्या घेण्याची गरज असल्याचे उदगार अध्यक्ष डॉ. पत्रिकर यांनी केले. तसेच वाचन प्रेरणा दिनी डॉ. कलामांना अभिप्रेत असलेला समाज घडविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ .वड्सकर यांनी केले.

वाचनातुन सामाजिक विकास होणे हीच कलाम यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे सुनील पाटिल यांनी यावेळी सांगितले. तर व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी ऐ. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे नेहमीच वाचन करणयाचे मत श्री.प्रमोद अणेराव यांनी मांडले. सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह जयंत आठवले यांनी सूत्र संचालन तर आभार रोशन उरकुड़े यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जवळपास 200 ग्रंथलायचे पदाधिकारी, ग्रंथपाल, कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात वाचक उपस्थित होते.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com