अपहृत झालेल्या अल्पवयीन मुलीचा ४८ तासाचे आत घेतला शोध, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

नागपूर :- दि. २५/०४/२०२३ रोजी एमआयडीसी परीसर, पोस्टे उमरेड हद्दीतून फिर्यादीचा अल्पवयीन लहान बहीण १० वर्षीय अपहृत अल्पवयीन मुलगी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याबाबत तक्रार पोलीस ठाणे उमरेड येथे प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीची दखल घेवून अज्ञात आरोपीविरुध्द पोस्टे उमरेड येथे अप क्र. २५१/२३ कलम ३६३ भादवि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता…

सदर गुन्हयाचा तपास हा वरीष्ठांच्या आदेशान्वये नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करुन अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सदर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सदर अपहृत मुलीचा शोध घेणेकरीता विविध पथक तयार करण्यात आले. पथकाने पोस्टे परीसरातील सिसीटीवी फुटेज पाहणी केली. पिडीत राहात असलेल्या एमआयडीसी, उमरेड परीसर, उमरेड शहरातील परीसर, महामार्ग व शहरातील हॉटेल, रिसॉर्ट, खानावळ, मंगल कार्यालय, महामार्ग व सिसीटीव्ही फुटेजची तपासणी अशी प्रत्येकास वेगवेगळी जबाबदारी देवुन पिडीत मुलीचा कुठलाही फोटो उपलब्ध असल्याने केवळ तिचे वर्णनाचे आधारावर अनेक लोकांना विचारपुस करून शोध घेतला. कॉटसअॅप व इतर सोशल मिडीयाचे माध्यमातुनही तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दि. २७/०४/२०२३ रोजी खात्रीशिर माहिती मिळाली की, अपहृत मुलगी ही गिरड रोड एमआयडीसी उमरेड हद्दीत सदर गुन्हयातील अल्पवयीन मुलगी एका कच्च्या रोडने एकटी फिरत असतांना दिसुन आली. सदर मुलीला स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण च्या पथकाने ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीस्तव पोस्टे उमरेड यांच्या स्वाधीन करण्यात आले.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात ओमप्रकाश कोकाटे पोलीस निरीक्षक, पोउपनि आशिष मोरपडे, पोहवा अरविंद भगत, नरेंद्र पटले, पोना बालाजी साखरे, अजीज शेख स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस स्टेशन पारशिवनी येथील फॉडरने २,७५,०००/- रु. चा घातला गंडा, सायबर पो.स्टे. ने १५ दिवसात तांत्रिक तपास करून आरोपीस केली अटक

Sat Apr 29 , 2023
पारशिवनी :- पोस्टे पारशिवनी येथे दाखल अप. क्र. ११९ / २०२३ कलम ४२० भादवी सहकलम 66 (C) (D) आय टी अॅक्ट मध्ये दाखल गुन्हयात यातील फिर्यादी याने त्यांचे ब्लॉक झालेले ए. टी. एम. कार्ड सुरू करण्यासाठी गुगलवर एस बी आय कस्टमर केअर नंबरचा शोध घेतला असता त्याद्वारे प्राप्त अनोळखी व्यक्तीने लगेच त्याचे मोबाईलवर फोन केला व फिर्यादीने वॉटसअॅपवर लिंक पाठविली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com