प्रिआंती इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये 11वा नवरस सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- काल 17 जानेवारी 2023 रोज मंगळवार ला श्री. गजानन शिक्षण सेवा संस्था नागपूर द्वारा संचालित प्रिआंती इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथे Kid Fest – 2023 11 वा वार्षिक नवरस सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी नवरस या थिमवर आधारित नृत्यांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले . नवरसमध्ये शृंगार, हास्य, शांत,करुणा, अद्भुत, बीभत्स, भयानक, रुद्र, विर या नवंवरसावर आधारित विद्यार्थ्यांनी कलागुणांचा व सांस्कृतिक कलेची प्रस्तुती दिली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सुनील केदार (माजी मंत्री, तथा,आमदार सावनेर विधानसभा ), प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे अध्यक्ष श्री. गजानन शिक्षण सेवा संस्था तथा सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर, दिलीप वंजारी उपसभापती पं.स. कामठी, आशिश मललेवार माजी उपसभापती पं स कामठी, अतुल बाळबुधे सरपंच केम , कश्यप सावरकर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं स कामठी , राजकुमार चोपकर केंद्रप्रमुख, रमेश लेकुरवाळे सचिव गजानन शि.से.स, किशोर तलमले सदस्य गजानन शि.से.स, उमेश्वर ठाकरे सदस्य गजानन शि.से.स, यशवंत राऊत सदस्य गजानन शि.से.स, प्राचार्या नंदा ठाकरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी , पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेची स्थापन सुरवात ते आजपर्यंतच्या शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीवर प्रकाश टाकला, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री आमदार सुनीलबाबू केदार यांनी शाळा व शाळा प्रशासनाचे कौतुक केले  त्यांनी शाळेबद्दल ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व मध्यमवर्गीय पालकांच्या पाल्याना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून शिक्षणाचे द्वार उघडे केले असे गौरवोद्गार काढले , व शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या

त्याचबरोबर केतकी अढाऊ ,मोनाली राऊत , प्रभाकर गोहणे, ज्योतीलाल राठोड , सविता धांडे , यांचा उत्कृष्ट शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणारे विध्यार्थी विहान शेंडे , मृणाल गिदमारे, हर्ष चांभारे, नक्ष काकडे, श्रुती कोसे, प्रिया खाडीकर, ऋतुजा भुडे, रिहांत गाडगे, यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, त्याचबरोबर विभागीय स्तरावर आयोजित शालेय उशू क्रीडा स्पर्धेत यश राऊत याने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल मेडल व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाध्ये एकूण 1100 विध्यार्थी सहभागी होते, तर कार्यक्रमाला 2000 ते 2500 पालकांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्याचा उत्साह द्विगुणित केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया लांजेवार यांनी तर आभार आशिष कावळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह ने कहा - प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी द्वारा शुरू किए गए गवर्नेंस सुधार कामकाजी महिलाओं को अनुकूल वातावरण देते हैं

Wed Jan 18 , 2023
डॉ. जितेंद्र सिंह ने महिला अधिकारियों और कर्मचारियों के कल्याण के लिए पिछले साढ़े 8 वर्षों में कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय द्वारा किए गए विशेष महिला केंद्रित उपायों की जानकारी दी नवी दिल्‍ली :- केंद्रीय विज्ञान और प्रौद्योगिकी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रधानमंत्री कार्यालय में राज्यमंत्री, कार्मिक, लोक शिकायत, पेंशन, परमाणु ऊर्जा तथा अंतरिक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com