संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट घालणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
कामठी ता प्र 13:-प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा तसेच नवीन जिंदल यांच्यावर गुन्हे दाखल करीत अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजसंघटने कडून होत असल्याच्या मागणीला विराम मिळत नाही तोच नुपूर शर्मा कुठे चुकीची आहे यावरून फेसबुक वर झालेल्या चॅटिंग कॉमेंट्स मध्ये कामठी ची एक तरुणी तसेच दोन तरुणांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह व अपमानास्पद संदेश व्हायरल केल्याने मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखावल्या , ही बातमी हवेसारखी पोहोचताच भारताच्या एकता व अखंडतेला गालबोट लावत , शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा आक्षेपजनक वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करीत अटक करण्याच्या मागणीसाठी कामठी शहरात काल रात्री 8 वाजेपासून ते मध्यरात्री साडे अकरा पर्यंत एकच चर्चेचा विषय ठरत शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण करीत जवळपास 5 हजार च्या वर संख्येतील मुस्लिम समाजबांधवांनी जुने व नवीन अश्या दोन्ही पोलीस स्टेशन ला घेराव करीत पोलीस प्रशासनाला वेठीस धरले.
नागपूर जबलपूर महामार्गावरील नवीन कामठी पोलीस स्टेशन ते हॉकी बिल्डिंग व गोयल टॉकीज चौक पर्यंत मुस्लिम समाजबांधवांचा एकच जमाव दिसून येत होता ,संतप्त जमावाने काहो काळ महामार्ग बंद केल्याने जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर काहींनी वाहनावर दगडफेक करून पोलीस स्टेशन समोरील एका पॉश हॉटेल वर सुद्धा दगडफेक केली .ही तनावपूर्ण स्थिती आवाक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी अतिरिक्त पोलीस दल बोलावीत खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार ,पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणण्यात यश गाठले व आरोपिवर गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्याच्या आश्वासितावर संतप्त जमावानी मोकळा श्वास घेतला.व तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. तर गुन्हा दाखल करण्यासाठी मायनोरीटीज डेमोक्रिटिक पार्टी चे नागपूर शहर अध्यक्ष फहीम खान तसेच न्यू येरखेडा रहिवासी अफजल शेख मो आरिफ शेख ने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून तसेच प्रेषित मोहम्मद पैगंबरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उन्नती बत्रा, रौनक यादव व अमन मेमन सर्व राहणार कामठी विरुद्ध रात्री 2 वाजता भादवी कलम 295, 153,34,66 सी, माहिती तंत्रज्ञान अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.