दहा दिवसीय विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रमाचा समारोप

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16:-आजच्या वर्तमान स्थितीत जगावर युद्धाचे सावट पसरले आहे या परिस्थितीतून समस्त मानव जातीला जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांचे विचारच या बिकट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात.वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण विश्वात शांतता स्थापित व्हावी, बुद्धांचे विचार पुनःश्च अंगीकृत केले जावे आणि मानव सदमार्गाला लागावा म्हणून भारतीय बौद्ध महासभा कामठी शाखा, समता सैनिक दल कामठी आणि कामठी च्या समस्त विहार शाखांच्या वतीने 6 ते 16 मे पर्यंत कामठी तील विहारा विहारात विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या विश्वशांती धम्मदेसना कार्यक्रमा अंतर्गत दहा दिवस शहरातील विविध विहारात धम्मदेसना करीत तथागत वेल्फेअर बुद्ध विहारात झालेल्या धम्मदेसनाने या दहा दिवसीय विश्वशांती धम्मदेसना कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.
या धम्मदेसना कार्यक्रमाची सुरुवात 6 मे ला करीत दररोज सकाळी साडे सहा ते रात्री 9 वाजेपर्यंत धम्मदेसना सुरू होती. या धम्मदेसना कार्यक्रमाचा शुभारंभ जयभीम चौकातील प्रज्ञा शिल करुणा बुद्ध विहारातुन करण्यात आली होती .यामध्ये सिद्धार्थ बुद्ध विहार,चंद्रमनी बुद्ध विहार,नाग बुद्ध विहार,राहुल बुद्ध विहार संलग्नित होते.7 मे ला धम्म दीप संघ बुद्ध विहार, 8 मे ला प्रबुद्ध विहार, 9 मे ला हरदास बुद्ध विहार, 10 मे ला तथागत बुद्ध विहार,11 मे ला सम्यक संबुद्ध विहार,12 मे ला धम्म साधना संघ बुद्ध विहार, 13 मे ला आनंद बुद्ध विहार,14 मे ला गौतम बुद्ध विहार तर ,15 मे ला तथागत वेल्फेअर बुद्ध विहार येथे धम्मदेसना कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला .तर 16 मे ला बुद्ध जयंती विशेष कार्यक्रम अंतर्गत सकाळी 9 वाजता जयस्तंभ चौक कामठी स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ध्वजारोहण करण्यात आले .तसेच शुक्रवारी बाजार चौक परिसर स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच महाकरूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक विशेष बुद्ध वंदना करण्यात आली. तर रात्री 8 वाजता समस्त विहाराविहारातून विश्व शांती कँडल मार्च काढून जयस्तंभ चौक येथे या कँडल मार्च चा समापन करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे वैशाख बुद्ध पौर्णिमा उत्साहात संपन्न

Mon May 16 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -महापरित्राण पाठ व धम्मदेसनाचा मोठ्या प्रमाणात घेतला लाभ कामठी ता प्र 16:- वैशाख बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आयोजित कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाले.वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित महापारित्रांन पाठ, महापरित्तदेसना घेण्यात आली.15 मे रोजी सायंकाळी 7 वाजेपासून मध्यरात्री पर्यंत पुज्यनिय भदंत महाथेरो बोधिरत्न, पूज्य भदंत मेत्तानंद,पूज्य भदंत नंदिता व इत्यादी पुज्यनिय भन्तेजिच्या उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com