▪️3 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात लिपिक-टंकलेखकाची 10 पदे आणि शिपाई/संदेश वाहक यांची 24 पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी दिनांक 2 डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
लिपिक-टंकलेखक या पदासाठी शैक्षणिक अर्हता कमीत कमी 12 वी उत्तीर्ण, टाईपिंग इंग्रजी 40 तर मराठी 30 श. प्र.मि. आवश्यक आहे.
शिपाई पदासाठी कमीत कमी 4थी व त्यापेक्षा अधिक वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
लिपिक टंकलेखक आणि शिपाई पदाकरिता खुला संवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास वर्गासाठी 43 वर्ष (5 वर्षे नियमाप्रमाने शिथिलक्षम) इतकी आहे. इच्छुक पात्र उमेदवारांचे अर्ज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी पर्यन्त कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्रमांक 2, दुसरा माळा, सिविल लाइन्स, नागपुर 440001 येथे स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास विभाग, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, प्रशासकीय भवन क्र.2, दुसरा मजला, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधावा.