नवी दिल्ली :- कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभाग अंतर्गत टेली-लॉ कार्यक्रमाने देशभरातील 40 लाख लाभार्थ्यांना खटला सुरु होण्यापूर्वी कायदेशीर सल्ला देऊन एक नवा महत्वपूर्ण टप्पा गाठला.
टेली-लॉ बद्दल : गरीब आणि दुर्बल घटकांना खटला सुरु होण्यापूर्वी कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन पुरवणारी ही एक ई-इंटरफेस व्यवस्था आहे. ही व्यवस्था पंचायत स्तरावरील कॉमन सर्व्हिस सेंटर्सवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/दूरध्वनी सुविधांद्वारे कायदेशीर मदतीची गरज असलेल्या गरजू आणि उपेक्षितांना पॅनेलच्या वकिलांशी जोडते. 2017 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या टेली-लॉ मोबाइल अॅपद्वारे (Android आणि 10S वर उपलब्ध) टेली-लॉ सेवेचा आता थेट लाभ घेता येतो.