संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 – कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिवस साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या प्रा सुनीता भौमिक होत्या.कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भौतिक शास्त्र विभागाचे प्रा ललित मासुरकर तर प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल उपस्थित होते.प्रा ललित मासुरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना डॉ राधाकृष्ण यांचाजीवन परिचय करून दिला तर प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचा अर्थ व आजची वास्तव परिस्थितीत शिक्षकांची भूमिकाकाय असावी यावर प्रकाश टाकला तर अध्यक्षीय भाषणातून प्रा सुनीता भौमिक यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रति सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची व आपसात मतैक्य राखण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन अंजली मेश्राम व आभार प्रदर्शन अस्मिता बावणे या विद्यार्थीनिनी केले.हा कार्यक्रम यशस्वी पणे घडवून आणण्यात प्रा शुभांगी बावनकुळे, प्रा हर्षा गेडाम,प्रा रुपाली अढावू,प्रा श्वेता कायरकर प्रा.पंकज वाटकर,प्रा मल्लिका नागपूरे,प्रा अनिता बैस प्रा,स्नेहल आदमने यांनी मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाला विद्यार्थी व बहूसंख्य शिक्षक उपस्थित होते.