तरोडी बु.येथे खरीप हंगाम नियोजन सभा.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यातील तरोडी बू येथे मंडळ कृषी अधिकारी सुहास अंबुलकर यांचे मार्गदर्शनात, खरिप पूर्व हंगाम नियोजन सभा घेण्यात आली. सदर सभेत शेतकऱ्यांना पुर्व मशागत, बियाणे निवड, लागवड पद्धत, बीजप्रक्रिया, उगवणक्षमता तपासणी, धान बीजप्रक्रिया, बांबू लागवड , MREGS फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, तुती लागवड (रेशीम उद्योग),ई विषयावर माहिती देऊन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक घेण्यांत आले. यावेळी कृषी सहायक कु.अश्विनी साखरे, . उमेश धावडे ग्रामसेवक, . महेश फुलवानी तलाठी, आरती चिकटे (सरपंच), धर्मेंद्र कडू ग्रामपंचायत सदस्य, तसेच शेतकरी सर्वश्री प्रमोद चिकटे, प्रवीण चिकटे, राजश्री महाजन, व गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोरवाल महाविद्यालयाचे बारावी परीक्षेतील सुयश..

Wed May 22 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी – मंगळवारला जाहीर झालेल्या वर्ग बारावीच्या निकालात सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत सुयश मिळविले आहे. विज्ञान शाखेत एकूण ३५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्या पैकी ३३२विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान विभागाचा निकाल९२.७३टक्के,वाणिज्य विभागात ३२७ पैकी २४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ७६.८९ टक्के तर कला शाखेचा निकाल ४२.५९ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com