#बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही…
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर नागपूरच्या नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे पिण्यायोग्य पाणी पुरवण्याच्या समर्पित प्रयत्नात, नागपूर महानगरपालिका-ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) ने नेहरू नगर झोनच्या स्वच्छतेचे वेळापत्रक जाहीर केले.
टाकी साफ करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, खालील भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल:
(A) सोमवार, 15 जानेवारी 2024 नंदनवन [जुने] ESR: नंदनवन लेआउट, कवेलू क्यूटीआरएस, एलआयजी, एमआयजी, व्यंकटेश नगर, कीर्ती नगर, न्यू नंदनवन कॉलनी, नंदनवन झोपडपट्टी, राजेंद्र नगर.
(B) मंगळवार, 16 जानेवारी 2024 नंदनवन [नवीन) ESR: श्रीकृष्ण नगर, शेष नगर, संकल्प नगर, गोपाळकृष्ण नगर, विद्या नगर, संताजी नगर, सरस्वती नगर, दर्शन कॉलनी, सद्भावना नगर, वृंदावन नगर.
(C) गुरुवार, 18 जानेवारी 2024 नंदनवन [राजीव गांधी] ESR: बापू नगर, भांडे प्लॉट, सिंधी बन, ताजबाग, गुरुदेव नगर, संतोषी माता नगर, प्रेम नगर, औलिया नगर
टाकीच्या साफसफाईच्या कालावधीत, या बाधित भागात पाणीप्रवठा होणार नाही, तसेच पाण्याची टैंकर सेवा देखील तात्पुरती अनुपलब्ध असेल. नागरिकांना विनंती आहे की या अत्यावश्यक देखभाल कार्यादरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.
NMC-OCW ने उपरोक्त प्रभावित भागातील नागरिकांना आवाहन केले आहे आणि या काळात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात.