दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा – मनसे

– उपविभागीय अधिकारी हरीश भामरे (SDO) कार्यालया अंतर्गत चुकीच्या पद्धतीने होणारे फेरफार – मनसे चे निवेदन सादर

नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन नागपूर शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे व उपशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे यांच्या नेतृत्वात दिनांक 23/8/23 बुधवारी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हरीश भामरे (SDO) यांना त्यांच्या कार्यालया अंतर्गत चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या फेरफार बाबत निवेदन देण्यात आले.

चुकीच्या फेरफार होत असल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय लोकांना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनाकरिता प्रामुख्याने उपस्थित विभाग संघटक चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष हर्षद दसरे, रोशन इंगळे, विनीत तांबेकर, विभाग सचिव साहिल बेहरे, महिला विभाग उपाध्यक्षा प्रिया बोरकुटे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अर्थ व सांख्यिकी सहसंकलन कृष्णा फिरके यांची मुंबई येथे बदली

Fri Aug 25 , 2023
नागपूर :- अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रादेशिक सहसंचालक कृष्णा फिरके यांची मुंबई येथील अर्थ व सांख्यिकी संचालनालयात सहसंचालक समन्वय या पदावर बदली झाली आहे. कृष्णा फिरके यांना नागपूर व अमरावती विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे निरोप देण्यात आला. सहसंचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपसंचालक मिलींद नारिंगे यांचेकडे सोपविण्यात आला आहे. सहसंचालक कृष्णा फिरके यांनी प्रादेशिक सहसंचालक नागपूर तसेच जिल्हा नियोजन अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com