स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे धडक कारवाई

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.21) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग न.31, एस.डी.हॉस्पीटल जवळ, गणेश नगर येथील अरमान बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत सुतिका गृह, कोटी रोड, महाल येथील मातृ सेवा संघ यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत बायो-मेडिकल वेस्ट कचरा रस्त्यालगत फेकल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

UNIT FLAME RUN BEING ORGANISED BY NATIONAL CADET CORPS ENTERS MAHARASHTRA ON DAY 32 TODAY

Thu Dec 22 , 2022
Nagpur :-The “Unity Flame Run” organised by National Cadet Corps entered Maharashtra today. The Unity Run which started on 20 Nov 22 from Kanyakumari was flagged off today at Mavala near Adilabad and reached Yavatmal enroute to Pandharkawada today. 1600 KM have been covered till today. Col KS Badhwar, Col DS Malik & Col NA Jha are part of 3000 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com