नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपाच्या गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे इतवारी स्थित पोस्ट ऑफिस जवळील लक्ष्मी ट्रेडर्स यांच्यावर आणि सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे पाचपावली येथील विशाल क्लोथ फॅक्टरी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे छत्रपती नगर येथील भावनगरी स्वीट मार्ट यांच्या विरुद्ध पादचारी मार्गावर कचरा ठेवल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रामदासपेठ येथील वन हेल्थ केअर यांच्यावर सर्वसाधारण कचऱ्यासह बायो मेडिकल वेस्ट आधाल्ल्याबद्दल कारवाई करीत २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय अमरावती रोड स्थित मोना पाईप्स यांच्यावर रस्त्यालगत अस्वच्छता पसरविल्याबद्दल कारवाई करीत ५ हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.