महाराष्ट्र शासनाच्या कर्जरोख्यांची 8.90 टक्के दराने 21 नोव्हेंबर रोजी परतफेड

मुंबई :- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या कर्जरोख्यांची 8.90 टक्के दराने दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

महाराष्ट्र शासनच्या वित्त विभागाच्या अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.16 नोव्हेंबर 2012 अनुसार 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 20 नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 21 नोव्हेंबर, 2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील तारखेस सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 21 नोव्हेंबर, 2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप – विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप -कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरित्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव शैला ए यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

NewsToday24x7

Next Post

WESTERN AIR COMMAND, IAF WINS THE AIR FORCE LAWN TENNIS CHAMPIONSHIP HELD AT NAGPUR

Sat Oct 22 , 2022
Nagpur :- Western Air Command, IAF wins the Air Force Lawn Tennis Championship 2022-23 held at HQ MC, Vayusena Nagar, Nagpur. The final match of team Championship was played between Western Air Command and Training Command in which Western Air Command emerged as the winner. The final of the open singles was played between Corporal Pradeep of Training Command and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com