स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.01) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्वस्त्याम सुपर स्पेशॉलिटी हॉस्पीटल, वर्धा रोड, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ग्रिन सिटी हॉस्पीटल, धंतोली, नागपूर व मे. अवांतिका हॉस्पीटल, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. मायरा स्टडी सेंटर, व मे. डेरा ग्रिन ॲन्ड डेव्हलपर्स, फ्रेन्डस कॉलोनी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार व 10 हजार प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.

हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एकविरा कंन्स्ट्रक्शन, तुकडोजी चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. विराज इन्फ्रा हाईट्स, श्रीराम नगर, नागपूर यांच्यावर फूटपाथवर सी आणि डी कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे राजेश बोरा, नरेन्द्र नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. चंदा डेयरी, हंसापुरी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शिवभोले स्विटस, प्रेमनगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महावितरणला अधिक लोकाभिमुख करा - मुख्य अभियंता दिलीप दोडके

Sat Sep 2 , 2023
नागपूर :- वीज ग्राहकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करून ग्राहक सेवा गतिमान करण्यासोबतच महावितरणला अधिक लोकाभिमुख करण्याचे आव्हान महावितरणच्या नागपूर परीमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले. श्रीकृष्ण नगर परिसरातील वीज ग्राहकांना जलद सेवा मिळावी यासाठी महावितरणच्या नंदनवन उपविभागा अंतर्गत असलेले श्रीकृष्ण नगर शाखेचे कार्यालय उमरेड रोड येथून निर्मल नगरी येथे स्थलांतरित करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन नागपूर परिमांडलाचे मुख्य अभियंता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com