नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.30) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 80 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एम.एस. अन्ना इडली, अभ्यंकर नगर, नागपूर यांच्यावर हॉटेलचे कचरा व अन्न टाकुन ड्रेनेज लाइन ब्लॉक केल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सिटी डेव्हलपर्स, दाभा, नागपूर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ऑर्चीड सनशाईन, मनिष नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. आरीफ किराणा, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. दि क्लासरुम, मंगलवारी मार्केट, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.