स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.28) 09 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्यामलाल क्रिष्णा अपार्टमेंट, तात्या टोपे नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्रीनाथ क्रियेशन, फ्रेन्डस कॉलोनी, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ग्लोबल सिटी हॉस्पीटल, सक्करदरा, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व मे. मा वैष्णवी इन्फ्रा, न्यु सुभेदार, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. दर्शनी कर्मशियल, सक्करदरा चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. बावनकुळे किराणा शॉप, गंजीपेठ व मे. साई किराणा शॉप, क्वेटा कॉलोनी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे.साई आर्शिवाद स्विटस, आनंद नगर, मंगलवारी व मे. सुनिल किराणा शॉप, मस्कासाथ इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 151 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Mon Aug 28 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (28) रोजी शोध पथकाने 151 प्रकरणांची नोंद करून 80600 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!