नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.03) 9 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. देवन्या रेसिडेंसी, छत्रपती नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एज्युकेशन हब, दत्तवाडी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. फ्रिडम रेस्टॉरेंट व मे. स्वर्ग बार ॲन्ड रेस्टॉरेंट, मानेवाडा बेसा रोड, नागपूर यांच्यावर कार्यालयाचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरविला असून कचरा शुल्क भरले नसल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. आनंद प्रिंटीग प्रेस, घाट रोड, नागपूर व अरून नखाले, मनिष नगर, नागपूर कार्यालयाचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरविला असून कचरा शुल्क भरले नसल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. नेहरू नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे आशीष अदले, निर्मल अपार्टमेंट वाठोडा, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जैस्वाल ट्रेडींग, इतवारी नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मोहित सोनपापडी, प्रेम नगर, नारायणपेठ, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com