हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे जनतेला आव्हान

नागपूर :- सन २०२३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक १९.०९.२०२३ पासुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाकडुन गणपती ची स्थापना करण्यात येते. यासाठी नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांनी सुध्दा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी सर्व पुर्वतयारी केली असून त्यामध्ये सार्वजनिक मंडळाला परवानगी देणे, मिरवणुकीचा मार्ग व त्या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती संबंधीत विभागाकडुन करवुन घेणे तसेच या उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होणार असल्याने सर्व सामान्य नागरीकांना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी पोलीस दल पूर्ण सज्ज असून अनुचित / घातपाताचा प्रकार घडणार नाही व उत्सवाच्या आनंदावर पाणी पडणार नाही. यासाठी रूट मार्च, गर्दीच्या ठिकाणी बसस्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार, इत्यादी महत्त्वाचे ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात आली आहे. कोणत्याही सर्वसामान्य नागरीकांकडुन जबरदस्तीने सार्वजनिक गणेशमंडळाकडून वर्गणी गोळा केली जाणार नाही यावर पोलीस दलाकडुन बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असुन असा प्रकार पडल्यास नागरीकांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अश्या मंडळाविरूद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सार्वजनिक मंडळाकडुन देखील असे प्रकार त्यांचेकडुन पडु नये याची दक्षता घेण्यात यावी असे आव्हान हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यानी जनतेला केले आहे. तसेच आगामी काळात मुस्लीम बांधवाचा ईद ए मिलाद या सणासंबंधी पोलीस दलाकडुन सर्व तयारी झाली असून, सर्व जनतेने सहकार्य करून येणारा दोन्ही उत्सव शांततेत पार पाडला जाईल याची काळजी घ्यावी.

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातून शिक्षा

Tue Sep 19 , 2023
काटोल :- फिर्यादी / पिडीता यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. काटोल येथे अप. क्र. १२९/२०१३ कलम ३५४ (अ) (१), ५०६ भा.द.वी. सहकलम ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील पिडीता / फिर्यादी व आरोपी हे एकाच गावात राहत असुन यातील पिडीता ही तिचे मोहल्यातील राहणाऱ्या आरोपी श्रावण रमेश बलांसे वय २५ वर्ष याचे घरी तिचे मोठ्या भावाचे पेन्ट आणण्यासाठी गेली […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com