नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.12) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. संजय शिरपूरकर, छत्रपती नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पार्क व्युव, वेलकम सोसायटी, दाभा, नागपूर व राजेश तारवेकर, लेन्ड्रा पार्क, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हॉटेल एन-एच-7, म्हाळगी नगर, हुडकेश्वर, नागपूर यांच्यावर हॉटेलचे सांडपाणी चेंबरशी जोडणी करुन आणि कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अनिल बिल्डस, रामेश्वरी, नागपूर, यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच हेमंत पांडे, घाट रोड, नागपूर यांच्यावर बांधकाम साहित्याचा कचरा जवळच्या नाल्यावर टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जनाब रज्जाक खलील अहमद, हंसापुरी, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विनोद स्विटस, भंडारो रोड, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्री गणेश टयुशन क्लासेस, गडडीगोदाम व कलश आर्युवेदीक हॉस्पीटल, दुर्गा माता चौक, छावनी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com