स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.10) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ज्योती हाईटस़, भरत नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कार वॉश सेंटर, वाठोडा, नागपूर, यांच्यावर कचरा टाकुन चेंबरमध्ये अडथळा आणणे आणि चेंबरला वॉशिंग पॉइंट बेकायदेशीरपणे जोडल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओम साई स्विटस, टिमकी, मोमिनपूरा, नागपूर व मे. गोपाल किराणा स्टोर्स, गोलीबार चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्योकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मिश्रा पत्तल शॉप, चकना चौक, मेहंदीबाग, नागपूर व मे. बारापात्रे स्टिटस, बंगाजी पंजा, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्योकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कॅलिबर गोल, सुर्या नगर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला.

आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. माईंडमी, जॉली फोनिक्स ॲन्ड इंग्लिश क्लासेस, कमाल चौक, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सतनाम इन्क्लेव, व मे. साई सबुरी अपार्टमेंट, सीएमपीडीआय रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 133 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Tue Jul 11 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (10) रोजी शोध पथकाने 133 प्रकरणांची नोंद करून 61500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com