स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई 

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार ता. 20) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. लुश हाऊस रेस्टॉरेंट, अभ्यंकर नगर रोड, नागपूर यांच्यावर डिसल्टिंग चेंबर आणि ड्रेनेजची लाइनला किचन वेस्ट थेट जोडणी केल्याबद्दल कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गुरुमौली डेव्हलपर्स, ओंकार नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. किशोर प्लास्टीक, स्मॉल फॅक्टरी एरीया, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा - राज्यपाल रमेश बैस

Wed Jun 21 , 2023
मुंबई :- “सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहोचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनविले पाहिजे”, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com