स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार ता.30) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गजभिये कंन्स्ट्रक्शन, दाभा, नागपूर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे स्वराज इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी, मानेवाडा रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ए.पी. रुम ओयो, न्यु मनिष नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे जानकीदेवी जैस्वाल, नंदनवन यांच्यावर परवानगीशिवाय अनधिकृतपणे सिवर लाईन जोडणीकेल्याबद्दल कारवाई 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. हरिष स्विट, न्यु बस्ती, तांडापेठ, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. न्यु गनगौर रेस्टॉरेंट, इंदोरा चौक, नागपूर यांच्यावर हॉटेलच्या कचऱ्याने ड्रेनेज लाइन ब्लॉक केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांनी अनुभवली निसर्गातील जैवविविधता

Tue May 30 , 2023
न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेजची गोरेवाडा जैवविविधता पार्क येथे शैक्षणिक भेट नागपूर :- महाल येथील न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र (बायोलॉजी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच निसर्गातील जैवविविधता अनुभवली. १६ मे २०२३ रोजी महाविद्यालयाद्वारे गोरेवाडा जैविविधता पार्क येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. शाळेच्या शिक्षिका डॉ. देवश्री नगरकर आणि बरखा जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात जीवशास्त्र विभागाच्या १५ विद्यार्थ्यांनी जैवविविधता पार्कमधील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com